Shree Bapu Ayurvedacharya
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Bapu Ayurvedacharya, Health/Beauty, Pune.
30/05/2021
#मराठी नाव:- #रिठा
#इंग्रजी नाव:- ,
(सोप - बेरी , सोप नट ).
#शास्त्रीय नाव. -
(सापिंडस ट्रिफोलिएटस )
#संस्कृत नाव:- #अरिष्ठ .
गुजराती नाव: - अरिठा .
हिंदी नाव :- रीठा .
#तेलगु:- #ककड .
फारसी:- . - फिदक .
#कोकणी नाव :- #रिंगिन
सॅपिंडस या प्रजातीत एकूण १५ जाती असून भारतात त्यांपैकी ७ आढळतात.
रिठा मूळचा द. भारतीय असून त्याचा प्रसार समुद्र किनाऱ्यावर व डोंगरांच्या उतरणीवर खालच्या भागातील विरळ जंगलात झालेला आढळतो. तो शोभेकरिता लावतात आणि प. बंगाल, बिहार, म. प्रदेश आणि उ. प्रदेश येथील खेड्यांत त्याची लागवड करतात.
#रिठा हा वृक्ष मध्यम आकाराचा पानझडी व सु.१८ मी. उंच व १·५ मी. घेर असलेला वृक्ष असुन याची साल करडी, चकचकीत असून तीवर खरबरीत व गळून पडणारे खवले असतात. रिठ्याचे लाकूड कठीण, जड आणि पिवळसर रंगाचे असते. ते बांधकामासाठी आणि बैलगाड्या तयार करण्यासाठी वापरतात.
#पाने:- संयुक्त, एकाआड एक, समदली, पिसासारखी आणि १२−१३ सेंमी. लांब असून दलांच्या जोड्या २−३ असतात : प्रत्येक दल भाल्यासारखे, लंबगोल किंवा आयत, लांबट टोकाचे अथवा सॅ. इमार्जिनेटस प्रकारात टोकास निम्नमध्य (खाचदार) असते.
#फुले:- या वृक्षाला लहान, नियमित, पांढरी द्विलिंगी व एकलिंगी फुले परिमंजरीवर [पुष्पबंध] ऑक्टोबर ते डिसेंबरात येतात; एकलिंगी फुले संख्येने बरीच असतात. संवर्त तांबूस, लोमश आणि प्रदले केसाळ असतात
#फळे :- अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे कोवळेपणी केसाळ, १·३−२·० व्यासाची आणि २-३ एकत्र जुळलेली असतात; पिकल्यावर ती मऊ व भुरकट होतात आणि वाळल्यावर आतील मगज सालीशी एकरूप होईन ती साल कडक व सुरकुतलेल्या दिसते. बिया २−३, काळपट, कठीण व वाटाण्याएवढा असतात.
रिठ्याच्या फळाच्या आतमधे काळे व कठिण बी असते त्याचे लहान मुलांस दृष्ट होऊ नये म्हणून बजरबट्ट करितात .
रिठ्याचे बी भिजू घालून त्यास भोके पाडून त्याच्या माळा करून शोभे साठी घोडयाच्या गळ्यांत घालितात .
दागिने वगैरे उजळण्याच्या कामीही सोनारास रिठ्याचा नेहमी उपयोग पडतो .
#रिठ्याची_लागवड बिया, फुडवे अथवा मुनवे लावून करतात.
रिठा बागेत शोभेकरिताही लावतात. याच्या प्रजातीचे सॅपिंडस हे नाव साबण (भारतीय) या अर्थाच्या लॅटिन शब्दांवरून आले आहे कारण भारतात याचा साबणाप्रमाणे उपयोग करतात. लॉरिफोलियस हे जाति वाचक नाव याची पाने लॉरेलच्या पानांसारखी असल्याने आले आहे. सॅ. मकेरोसी जातीचा प्रसार उत्तर भारतात व आसामात १,५०० मी. उंचीपर्यंत झाला आहे. इतर भागात त्याची फळांसाठी लागवड केलेली आढळते.
#अरीष्ट_अर्थात_रीठा_त्वचेवर_उपयोग_फार_मोठा
अंघोळ करतांना रीठा, शीकेकाई , बावची (जरा कमी घ्यावी ),संत्रासाल, आवळा पावडर बारीक करुन अंगास लावुन अंघोळ करावी.
त्वचा मुलायम व नीरोगी राहते, अंगावरील मळ साफ होते..
रिठ्याच्या फळांचा उपयोग मुख्यत: मळ काढण्यासाठी होतो. त्यात सॅपोनीन वर्गातील संयुगे असतात. ही संयुगे पाण्यात विरघळणारी ग्लायकोसाइडे आहेत. रिठ्याची फळे पाण्यात घुसळल्यास त्यांतील सॅपोनिने फेस तयार करतात. म्हणून त्यांचा उपयोग साबणासारखा केला जातो. लोकरी, रेशमी आणि नाजूक व तलम सुती कपडे धुण्यासाठी रिठे वापरतात. हल्ली त्यांचा उपयोग वॉशिंग पावडरमध्ये सुद्धा करतात. सोन्याचे दागिने स्वच्छ व चकचकीत करण्यासाठी आणि साबण, शाम्पू व टूथपेस्ट बनविण्यासाठी तसेच कीटकनाशकांमध्ये रिठ्याची फळे वापरली जातात.
आता केमीकल साबन आपन वापरतो, पन निसर्गाने दिलेला नैसर्गिक साबन रीठा कीतीतरी सुंदर आहे.
या कडे मात्र दूर्लक्ष होत आहे....
#रिठा_उपयोग
1)रिठा हा मोठा विषनाशक आहे - रिठ्याचे पाणी करून डोळ्यांस अंजन करावे ; म्हणजे विष उतरते . विषाचा जोर फारच मोठा झाल्यास , रिठ्याचे पाणी करून ते प्यावयास द्यावे ; म्हणजे उलटी होऊन त्वरित विष उतरते . अफू , बचनाग , सोमल , मोरचूद , हरताल आदिकरून कोणतेही विष पोटात गेले असल्यास , रिठ्याचे पाणी करून प्यावयास द्यावे ; म्हणजे वमन होऊन सर्व प्रकारची विषं उतरतात . अंजनानंतर रिठ्याच्या पानाचाही रस सर्वांगास चोळावा . रिठ्याच्या अंजनाने विष उतरल्यावर डोळ्यांची आग होते व डोळ्यांत लाली चढते , ती नाहीशी होण्यास - डोळ्यांत लोणी किंवा तूप , दोन तीन दिवस घालीत जावें ; म्हणजे डोळे बरे होतात . कोणत्याही रोगावर रिठ्याचे अंजन केल्यास , उतार पडल्याबरोबर डोळ्यांत तूप घालावें , म्हणजे आग होणार नाही .
( २ ) विंचवाच्या विषावर - एका रिठ्याच्या टरफलाच्या , गुळांत तीन गोळ्या करून प्रथम एक गोळी खाऊन वर थोडे थंड पाणी प्यावे . नंतर थोड्या वेळाने दुसरी गोळी खाऊन थोडे ऊन पाणी प्यावे . नंतर तिसरी गोळी खाऊन थंड पाणी प्यावें . म्हणजे विष उतरते . तंबाखू ओढण्याची संवय असल्यास तंबाखूप्रमाणे रिठा चिलमींत घालून ओढावा ; म्हणजेही विंचवाचे विष तत्काळ उतरतें .
( ३ ) कफ जाड होऊन उरांत दाटल्यास रिठ्याची साल खावी ; म्हणजे कफ पातळ होऊन पडेल .
( ४ ) नळवायूस - - रिठ्यांचे पाणी करून तें प्यावयास द्यावे व फेंस पोटास चोळावा .
( ५ ) मस्तक - रोगावर - रिठ्याच्या पाल्याच्या रसांत मिरी उगाळून , तो रस नाकांत पिळावा ; म्हणजे मस्तकशूळ , अर्धशिशी वगैरे मस्तकरोग बरे होतात .
( ६ ) नंदवायूवर - प्रसूत स्त्रियांस एकाएकी मस्तकांत वायू होऊन मस्तक जड होते व फिरतें ; डोळ्यांपुढे अंधेर्या येतात , दांतखीळ बसते , वगैरे लक्षणे झाल्यास या वायूस नंदवायु ( अनंतवात ) असे म्हणतात . यावर रिठ्यांच्या फेंसाचें अंजन करावें , म्हणजे वायूचा झटका उतरतो . नंतर डोळ्यांत लोणी अगर तूप , दोन - तीन दिवस घालावे .
( ७ ) उष्णतेने अंगावर लाल व पसरणारे गजकर्णासारखे नायटे होतात त्यास रिठ्याचा फेंस नायट्यांवर दिवसांतून दोन - तीन वेळ लावून घटकाभर जिरूं द्यावा . नंतर ऊन पाण्याने ती जागा धुऊन टाकीत जावी . म्हणजे ते चट्टे बरे होतात .
( ८ ) उन्हांतून फिरून आल्याने पायांची आग झाल्यास - पायांस रिठ्याचा फेंस लावावा .
( ९ ) नारूवर - रिठ्यांतील मगज व हिंग ऊन करून बांधावा .
( १० ) अपस्मारावर - रिठा लिंबाच्या रसात उगाळून त्याचे नस्य द्यावे .
( ११ ) मोडशी व तिडकांस - रिठा चोळून , त्याचा फेंस पोटास व पायास चोळावा , व थोडा पोटांतही द्यावा .
( १२ ) रक्तगुल्मावर रिठ्याच्या पाण्यात कडू वृंदावनाचे मूळ उगाळून द्यावे ; म्हणजे रक्तगुल्म गळून पडतो .
( १३ ) धनुर्वाताप्रमाणे गुरास मुरडी किंवा धनकी रोग होतो त्यावर - रिठ्याचा फेंस काढून दोन्ही डोळ्यांत अंजन करावे . गुण आल्यानंतर तीन दिवस नित्य डोळ्यांत लोणी घालीत जावे .
( १४ ) गुरांस सर्पदंश झाल्यास रिठ्याच्या फेसाचे अंजन करावे व रिठ्याचे पाणी एक शेरपर्यंत पाजावे
संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi,
[संदर्भ -आयुर्वेदमहोपाध्याय कै.शंकर दाजीशास्त्री पदे गुरुजी स्वानुभव]
मात्रा - फळ वापरावे वमनासाठी 3ते6 ग्रॕम .रेचनसाठी 4ते 8 ग्रॕम अन्यथा 0.5 ते 1 ग्रॕम
#विशेष_टिप
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शन पर प्रारंभिक शास्त्रोक्त .माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा .
Copy pest
17/05/2021
*कफची समस्या दूर करते केशर, वाचा इतर खास फायदे-*
खरे केशर ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे. खरे केशर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळते. केशर ओल्या कपड्यामध्ये रगडावे. केशर खरे असेल तर पिवळा रंग दिसतो. खोटे भेसळयुक्त असेल तर सुरुवातीला लाल आणि नंतर पिवळा रंग दिसून येतो. केशरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून त्याच्या वापराने अनेक आजार बरे करता येतात.
हे आहेत फायदे
▪️कमी रक्तदाबावर केशर एक प्रभावी उपाय आहे. सर्दी झाल्यास एक ग्लास दूधात चिमुटभर केशर आणि एक चमचा मध टाकून प्यायल्यास आराम पडतो.
▪️त्वचेवरील सुरुकुत्या दूर करण्यासाठी केशराचा लेप रामबाण उपाय आहे.
▪️ सांधेदुखीचा आजार असलेल्या लोकांनी केशराचे सेवन अवश्य करावे. यामुळे शरीरातील थकवा दूर होतो तसेच मांसपेशीला आराम मिळतो.
▪️ अनिद्रेची समस्या असेल तर केशराच्या उपायाने ही समस्या दूर होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी दुधात केशर टाकून प्यायल्यास अनिद्रेची समस्या दूर होते.
▪️हिस्टीरिया सारखा आजार नियंत्रात ठेवण्यासाठी केशर फायदेशीर ठरते.
▪️तुम्हाला एखादी जखम झाली असेल तर त्यावर केशराचा लेप लावल्यास लवकर आराम मिळेल.
▪️केशर चंदनासोबत मिसळून कपाळावर लावल्यास डोळे आणि मेंदूला थंडावा मिळतो तसेच शरीरात स्फूर्ती राहते.
▪️डोकेदुखी दूर करण्यासाठी केशराचा उपयोग केला जाऊ शकतो. चंदन आणि केशर एकत्रित करून हा लेप डोक्याला लावल्यास लवकर आराम मिळेल.
▪️नाकातून रक्त येत असेल तर यावर उपचारासाठी केशर उपयुक्त ठरते. चंदन आणि केशराचा लेप नाकावर लावल्यास नाकातून येणारे रक्त थांबेल.
▪️महिलांमधील अनियमित मासिक पाळी तसेच पाळी दरम्यान होणारा त्रास केशर सेवन केल्याने कमी होतो. याचबरोबर गर्भाशयावर आलेली सूजही कमी होते.
▪️महिलांमधील उदासिनता कमी करण्यासाठीही केशर उपयोगी आहे. दररोज दोन केशर दूधात टाकून प्यावे.
▪️गर्भवती महिलेने केशर खाल्याने सुदृढ बालक जन्माला येते. बाळाची कांती उजळ होते. कधी-कधी नवजात शिशुचे सर्दीमुळे नाक बंद होते आणि बाळ तोंडाने श्वास घेते अशा वेळी आईच्या दूधात केशर मिसळून ते बाळाच्या डोक्यावर आणि नाकावर लावावे. तसेच थोडं केशर दूधही बाळाला पाजावे.
▪️ अपचन, पोटदुखी, गॅस या सारख्या समस्यांवर केशर एक रामबाण औषण आहे.
*◼केशराचा उपयोग-*
▪️ केशर विविध पद्धतीने उपयोगात आणले जाते. जर तुम्हाला हिवाळ्यात कफ होत असेल किंवा हृदयाचा आजार असेल तर केशराचे सेवन फायदेशीर राहील.
▪️पानमसाल्यात सुगंधासाठी केशराचा वापर केला जातो.
▪️हिवाळ्यात केशरयुक्त दूध प्यायल्याने त्वचा नितळ बनते. केशर, मध आणि बदाम एकत्र खाल्याने पुरूषांची वीर्यशक्ती वाढते.
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
*(कॉपी पेस्ट)*
11/05/2021
*घशातील खवखव हमखास दूर करेल ज्येष्ठमधाचा तुकडा*
वातावरणातील बदलांमुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास औषधगोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणं शक्य आहे. याकरिता ज्येष्ठमध फायदेशीर ठरते.
*याकरिता नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळत रहा.*
*ज्येष्ठमधाचे फायदे ?*
*मेंदूला चालना-*
▪ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते.
▫यामधील अॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात.
*हृदयाचे आरोग्य-*
▪कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.
*रोगप्रतिकारशक्ती-*
▪शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक घटक लिम्फोसाइट्स आणि मैक्रोफेज ज्येष्ठमधामध्ये असतात.
*हार्मोनल संतुलन-*
▪ज्येष्ठमधातील फाइटोस्ट्रोजेनिक घटक महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन नियमित ठेवण्यासाठी मदत करते.
▫मेनोपॉजचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.
*अॅन्टी बॅक्टेरियल-*
▪शरीरात घातक मायक्रोबायल्सची वाढ रोखण्याची क्षमता ज्येष्ठमधामध्ये आहे.
▫यामुळे शरीरात व्हायरसचा धोका कमी होतो.
*अॅन्टी अल्सर-*
▪ज्येष्ठमधामध्ये अॅन्टिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असल्याने पोटातील, आतड्यामधील, तोंडातील अल्सरचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
शेवगा
शेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. या शेवग्याचे फायदे आणि गुणधर्म आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
• शास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा
• हवामान – या झाडासाठी समशीतोष्ण आणि दमट वातावरण आवश्यक असते.
• उंची – साधारण उंची १० मी. असते.
प्रमुख उपयोग
शेवग्याच्या शेंगा कालवण, कढी, आमटी किंवा सुकी भाजीत शिजवून खाल्ल्या जातात.
या झाडाची पाने, फुले, फळं, साल, आणि मुळे या सर्वांचा उपयोग आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक उपचारात केला जातो. बियांपासून तेल सुद्धा काढले जाते आणि पानांपासून आपण भाजी बनवू शकतो.
शेवगा हा हाडांसाठी वरदान आहे. यामध्ये कॅल्शिअम आणि प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात.तसेच कार्बोहायड्रेट, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी अशी भरपूर जीवनसत्त्वे शेवग्यामध्ये आढळतात.
कोवळ्या पानांची भाजी महाराष्ट्रात मृग नक्षत्रात केली जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शरीरातील वातदोष वाढलेला असतो म्हणून ही भाजी तेव्हा आवर्जून खाल्ली जाते.
शेवग्याचे आयुर्वेदिक गुणधर्म
हाडे मजबूत आणि निरोगी राहण्याकरिता शेवग्याची भाजी नियमित सेवन करावी.
वजन जास्त वाढले असल्यास शेवग्याच्या शेंगेचे सूप बनवून प्यावे. नियमित पिल्यास चरबीचे प्रमाण कमी झालेले दिसेल. याबरोबरच नियमित व्यायाम देखील करावा.
तसेच संधिवात, नेत्ररोग, स्नायूंची कमजोरी या व्याधी देखील बऱ्या होतात.
शेवगा हा उष्ण आहे म्हणून त्याचा वात आणि कफ या प्रकारच्या विकारांवर उत्तम उपयोग होतो.
शेवगा हा उत्तम पाचक आहे. पोटातील पचनक्रिया व्यवस्थित होऊन रक्तप्रवाह सुधारतो.
शरीरावर किंवा शरीराच्या आतील भागात आलेली सूज शेवग्याच्या सालीच्या काढ्याने कमी होते.
डोकेदुखी व जडपणा यावर शेवगा अत्यंत गुणकारी आहे.
शेवगा जंतनाशक असल्याने पोटातील कृमी विष्ठेवाटे बाहेर पडतात.
रक्तदोष, मुतखडा, उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांमध्ये शेवगा गुणकारी आहे.
सौंदर्य खुलवण्यासाठी उपयोग
अनेक जीवनसत्त्वांची कमतरता शेवगा भरून काढतो. जसे अन्न तसे मन आणि शरीर, या उक्तीप्रमाणे तुम्ही शेवगा नियमित सेवन करत असाल तर तुमचे साैंदर्य खुलवण्यात नक्कीच सहयोग होईल. त्वचाविकार, थकवा, आणि डोळ्यांचे विकार यामध्ये शेवगा नियमित सेवन करा. नक्कीच लाभ होईल व शारीरिक कांती उजळेल.
*ऑक्सिजन*
ऑक्सिजन ची व्यवस्था पुरती कोसळली आहे ... ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक मृत्युमुखी पडतात आहेत, अशा मृत्यूंचे प्रमाण मे महिन्यात फार मोठे असेल.
खालील माहिती शेअर करा कॉपी/ पेस्ट करा पण जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा
जे रुग्ण आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी चे उपचार घेतात त्यांना ऑक्सिजन अत्यंत अपवादात्मक परिस्थिती मध्ये लागतो ....
जे रुग्ण allopathy चे उपचार घेतात आहेत त्यांनी डॉ अकल्पिता परांजपे यांनी सांगितलेली खालील दोन औषधे सुरू ठेवावीत बाहेरील ऑक्सिजन ची गरज कमी होईल, आणि सुरू नसल्यास लागणार नाही ...
.......................
*१ काढा*
आयुर्वेदात असे लिहिले आहे कि ज्या अंगणात अडुळश्याच झाड असेल त्या घरात फुफुसांच्या रोगाने अपमृत्यु येणार नाही. त्यावरून तयार केलेले व अत्यंत उपयुक्त असे हे मिश्रण खालील प्रमाणे आहे:
अडुळसा ५० ग्राम
तुळस ५० ग्राम
जेष्टीमध २५ ग्राम
गुळवेल २५ ग्राम
सुंठ २५ ग्राम
पिंपळी १० ग्राम
दालचिनी ५ ग्राम
वेलदोडा ५ ग्राम
काळे मिरे ५ ग्राम
या सर्वांची पूड एकत्र करून प्रत्येकी १/२ चमचा २ कप पाण्यात घालून १/२ कप पर्यंत आटवावे. सकाळी व संध्याकाळी चहा सारखे घ्यावे. सर्व औषध सहजगत्या मिळतात. या औषधांनी (१) श्वसनाचा त्रास कमी होईल (२) तापमान जास्त वर जाणार नाही. (३) पचनक्रिया चांगली राहील. (४) फुफुसांना बळ मिळेल.
*2 ओली हळद आणि कडुनिंब:*
कडूनिंबाची पानं स्वच्छ धुऊन कपड्यावर सुकवून घ्यावी. त्यात प्रत्येकी १० ते १२ बारा पानांना अर्धा ईंच या प्रमाणात ओल्या हळदीचा तुकडा घालून मिक्सर मधुन चटणी करावी व त्यात तितकाच गुळ घालून परत वाटून घ्यावं. रोज सकाळी एक छोटा चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावी.
ह्याच मिश्रणाच्या गोळ्या करून ठेवला तरी चालेल
*३ अतिदक्षता विभागात* ऑक्सीजन वर असलेल्या रुग्णांकरिता वरील अर्धाकप काढ्यात कडुनिंबाची चाळीस पाने आणि अर्धा ईंचओली हळद घालून मिक्सर मधून फिरवून घ्यावे. नंतर ते जाड फडक्याने गाळून घ्यावे. त्यात गूळ घालावा आणि जेवणाच्या डब्याबरोबर ज्युस म्हणून पाठवून द्यावे. हे मिश्रण चार भागात विभागून एका दिवसातून चार वेळा असे तीन दिवस द्यावे. तीन दिवसा नंतर कडुनिंबाची दहा ते बारा पाने द्यावीत.
….....…..............................
All types raw Hearb available in 100% genuine and pure .
Shree Bapu ayurvedacharya
7767090989/9923291212
06/04/2021
💯% virgine coconut oil 100ml only 149/-
10/03/2021
21/06/2020
Happy International Yoga Day 2020
शरीर मे से चर्बी कम होती तो किस चीज मैं बदलती है!
आज आप सोचे ?
04/06/2020
Reetha powder unknown amazing Benefits:-*
Soapnut ,रीठा ।Boondi Kottai, Amtalakaayi ,
* It's antibacterial or anti allergic in nature.
*It's natural venom for snack and scorpion
*Good for Hair health.
* hair Dandruff
*skin itching
* Intentional worms.
* Head lice
*Asthama.
For more details and order pls call and whatsapp 7709002701.
50gm,100gm,200gm,500gm,and 1 kg packing available.
03/06/2020
Shikekai powder Amazing Benefits:-
शिकाकाई पावडर, कण्टवल्ली ,शिववल्ली।
*Hair softner and shine.
*Fights Dandruff.
* Gives stronger and thicker hair
*Prevent a dry scalp.
*Removes hair lice.
*Smothes your head.
*Reduces hair loss.
*It's is a cheaper and better.
For more details and order pls call and whatsapp 7709002701.
50gm,100gm,200gm,500gm,and 1 kg packing available.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Contact the business
Telephone
Website
Address
412207
