Flex Hardcore Gym Ratnagiri - sandeep Bava
Do Perfect..Be Perfect..!!
13/03/2026
भारतीय महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्षा सौ.वर्षाताई ढेकणे यांच्या मार्गदर्शनाने मध्यमंडळ तालुकाध्यक्षा सौ.सुचिता ताई नाचणकर यांच्या सहकार्याने सौ.नुपुराताई मुळ्ये सरचिटणीस सौ. दिप्ती फडके बेसिक तालुका उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत कोषाध्यक्ष सौ. सपना सावंत यांनी जागतिक महिला दिनानिमित्त भावेआडोम येथे मध्यमंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
महिला दिनाचे औचित्य साधून श्री अन्न महोत्सव आणि श्री अन्न महत्त्व या अंतर्गत नाचणी आणि त्यापासून मिळणारे फायदे सांगत सौ. नेत्रा करंदीकर आणि सौ. गिरीजा भिडे यांनी उत्कृष्ट पदार्थ बनवून दाखवले. तसेच सौ.नेत्रा करंदीकर आंबा काजू व्यवसाय करतात.तळलेले गरे,मिरची देश परदेशात पाठवतात. सौ गिरीजा भिडे यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे त्या पंचकर्म देखील करतात.
उद्योजिका म्हणून सौ.सपना महेंद्र सावंत यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा आंबा व काजू व्यवसाय आहे. कुक्कुटपालन , सिरप, व अनेक प्रकारची पीठ बनविणे असा व्यवसाय असून तिथल्याच लोकांना रोजगार मिळवून दिला आहे .
क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी म्हणून कु.मनश्री प्रकाश मांडवकर हिचा सत्कार करण्यात आला. ती क्रिकेट खेळते.
कार्यक्रमाचे निवेदन मध्यमंडल सचिव सौ. मेधा देवस्थळी यांनी केले. कार्यक्रमाला श्री.संदीप नाचणकर, नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस श्री.ओंकार फडके, श्री.परशुराम (दादा )ढेकणे शहराध्यक्ष हे या कार्यक्रमाला उपस्थित होते .मध्यमंडळ सरचिटणीस सौ.शिवानी रेमुळकर, सचिव सौ. मेधा देवस्थळी, सहसचिव सौ. अनुष्का शेलार. सदस्य सौ. सुमन घाणेकर, सौ. किंजल लिंगायत, सौ.सोनम पाटील आणि सौ. मंजिरी चव्हाण सौ. राजश्री मोरे, सौ. कीर्ती मोडक, दिव्या गावडे, उर्मिला माडवकर कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
14/01/2026
भारतीय जनता पार्टी च्या मध्य मंडळ महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ सुचिता नाचणकर यांनी श्री. गणेश सुर्वे यांची कन्या कुमारी गौरी सुर्वे हिची बी.टेक + एम. टेक ड्युअल डिग्री (केमिकल इंजिनिअरिंग) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर इंडिया,येथून स्वित्झर्लंड येथील शाश्वत आणि उच्च कार्यक्षमता विशेष रसायनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्लेरिअन्ट इंटरनॅशनल लिमिटेड येथे ग्लोबल ऑपरेशन्स आणि प्रोसेस टेक्नॉलॉजी या विभागावर ग्रॅज्युएट प्रोसेस इंजिनियर या पदासाठी निवड करण्यात आलेली आहे ** . *तिच्या या यशाबद्दल तिचे व कुटुंबियांचे श्री नगर खेडशी रहिवासी व भाजपा पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या* 💐💐💐💐💐💐💐💐💐
06/01/2026
*भावे आडोम येथील आदिष्टी गांगोबा भराडीन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुचिता संदीप नाचणकर यांच्याकडून ५१ हजार रुपयांची देणगी*
*रत्नागिरी, प्रतिनिधी :* भावे आडोम येथील आदिष्टी गांगोबा भराडीन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भाजपा महिला मोर्चा मध्य मंडळाच्या तालुकाध्यक्षा सुचिता संदीप नाचणकर यांनी रोख ५१ हजार रुपयांची देणगी दिली.
भावे आडोम येथील आदिष्टी गांगोबा भराडीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. त्यासाठी येथील ग्रामस्थांनी देणगीसाठी आवाहन केले होते. त्यानुसार भाजपा महिला मोर्चा मध्य मंडळाच्या तालुकाध्यक्षा सुचिता संदीप नाचणकर यांनी रोख ५१ हजार रुपयांची देणगी दिली. यावेळी सुचिता नाचणकर यांच्यासोबत उपाध्यक्ष संदीप नाचणकर, भावे आडोम येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ विश्वास गजानन मराठे, दीपक परशुराम पवार, वसंत लक्ष्मण सनगरे, नारायण लक्ष्मण सनगरे, सुरेश गोपाळ तांबे, संतोष भिकू तांबे, सत्यवान विठ्ठल तांबे, सुरेश सोनू तांबे, संतोष वसंत गावडे, चंद्रकांत भागा कारकर, काशिनाथ शंकर तुळसणकर, शंकर भिकू मांडवकर, अनिल कृष्णा लिंगायत, संतोष सोनू आंबेकर, मुकेश सुभाष माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
29/12/2025
RSS..!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Address
Ratnagiri
415639
Opening Hours
| Monday | 6am - 12pm |
| 3pm - 10:30pm | |
| Tuesday | 6am - 12pm |
| 3pm - 10:30pm | |
| Wednesday | 6am - 12pm |
| 3pm - 10:30pm | |
| Thursday | 6am - 12pm |
| 3pm - 10:30pm | |
| Friday | 6am - 12pm |
| 3pm - 10:30pm | |
| Saturday | 6am - 12pm |
| 3pm - 10:30pm |
