Pankaj Tagde

Pankaj Tagde

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pankaj Tagde, Health/Beauty, Nagpur.

( सामाजिक कार्यकर्ता)
PG in Medical and psychiatric social worker, MBA in Human Resource management, BE in mechanical engg, Diploma In Sanitary Health Inspector

07/06/2026

देश TB मुक्त करूयात, आरोग्याची कास धरूया

07/06/2026

सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय निवासी शाळेत नवबौद्ध आणि अनुसूचित जातीच्या , VJ, SBC, NT समाजाच्या विद्यार्थ्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. संबंधितांनी लाभ घ्यावा.
संपर्क संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्याशी साधावा

07/06/2026

समाज कल्याण शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत सुरू असून यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळणे साठी अर्ज मागविणे सुरू आहे. संबंधितांनी अर्ज करून घ्या.

31/05/2026

माणूस जरी वयाने मोठा झाला... पण तो मानसिक आणि सामाजिक प्रगल्भ असेलच असे नाही..

उदाहरणार्थ सार्वजनिक संभाषणात शिव्यांचा वापर हे उतावळेपणाच लक्षण आहे.... शहाणपण नाही. मानसिक सुज्ञ व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी अभिव्यक्त होताना त्यांचा आयुष्यातला अनुभव, तत्कालीन सभोवतालची परिस्थिती इत्यादी बाबी नजरेसमोर ठेवून व्यक्त होतोय.

23/04/2026

मानसिक आरोग्यावर आधारित अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात असणे खूप आवश्यक आहे. पालकांनी आपल्या पाल्यांप्रती भावनिक, मानसिक दृष्टिकोनातून व्यावहारिक वर्तन करणे अत्यंत आवश्यक आहे... त्यांनी आपल्या मुलांचा मानसिक दृष्टिकोन कणखर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.... एखादी परीक्षा म्हणजे संपूर्ण आयुष्य नव्हे... मानवी दृष्टिकोन कणखर असला की... माणूस कोणत्या पण क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो...

Photos from Pankaj Tagde's post 14/04/2026

के टी एस जिल्हा सामान्य रुग्णालयात आज राज्यघटनेचे शिल्पकार, कायदेतज्ज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, महान राज्यशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला जिल्ह्याचे शल्य चिकिस्तक डॉ. पुरुषोत्तम पटले सर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. तृप्ती कटरे मॅडम व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक या रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक ( वैद्यकीय) पंकज तागडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

13/04/2026

भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक,
आणि मागासवगीर्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारून कायदेशिरीत्या सामाजिक भेदभाव नष्ट करणारे, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या कायदेशीररीत्या तरतूद करून हक्क देणारे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक, देशाच्या विविध क्षेत्रांत जसे RBI स्थापना, इरिगेशन (भाक्रा नांगल प्रकल्पाची संकल्पना), नदीजोड प्रकल्प इत्यादी बाबत महत्वाचे योगदान देणारे, OBC (340), SC(341), ST (342) यांच्या कायदेशीर आरक्षणाचे जनक, आधुनिक भारताचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐👍🏽👍🏽

11/04/2026

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏 स्त्रीशिक्षणाची पायाभरणी, मागासवर्गीयांना शिक्षणाची दारे उघडली, सत्यशोधक समाजाची स्थापना , प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यासाठी प्रयत्न, प्रस्थापित वर्णव्यवस्थेवर प्रहार करून सामाजिक क्रांती केली, जातीयवादि रूढींना मूठमाती दिली... अनंत कार्य बा ज्योतिबा तुमचे..आज तुमच्यामुळे आम्ही अनुकूल वातावरणात जगत आहे. 🙏🙏

31/03/2026

आरोग्यसंपन्न गाव अभियान.

30/03/2026

*सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग*

*सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गोदिंया*

*अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, नंगपूरा-मुर्री, ता. जि. गोदिंया.*

*मोफत प्रवेश देणे सुरू आहे.*

*सत्र : २०२६-२७ करीता*

*वर्ग - ६ ते १०*

*फक्त काहीच जागा शिल्लक आहेत.*
(प्रत्येक वर्गासाठी ४० ची प्रवेशिका)

प्रवेश संवर्ग - SC, ST, VJ- NT, SBC

माध्यम - सेमी इंग्रजी

👉 *प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे*
१) मुळ टीसी (original)
२) गुणपत्रिका झेरॉक्स
३) आधार कार्ड झेरॉक्स अपडेट (पालक)
४) जातीचा दाखला caste
५) पासफोटो - पाच
६) बॅंकेचे खाते विद्यार्थी
७) अप्पर आय.डी.
८) १०० रुपये कोरे स्टॅम्प
९) पालकाचे उत्पन्न दाखला (तहसील)
२.५० लाख पर्यंत

👉 *टिप- माहिती पत्रकात दिलेल्या सर्व सोयी सुविधा मोफत विद्यार्थ्यांना मिळतात.*

संपर्क - *मुन्नाभाई नंदागवळी सर*
(सहायक शिक्षक, माध्यमिक विभाग)
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपूरा-मुर्री.
*संवाद - 9764676499*

Want your business to be the top-listed Beauty Salon in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Nagpur