Nari Shakti Yoga Kendra

Nari Shakti Yoga Kendra

Share

I’m Jyoti Shinde, founder of Nari Shakti Yoga & Naturopathy Center.

Certified Naturopath & Medical Yoga Therapist, dedicated to women’s wellness.
🌸 NariSaumya – Grace, Balance & Natural Healing for PCOS/PCOD with Yoga + Naturopathy.

03/09/2025

21 Days Glow & Fitness Challenge
Everyone who fills this form & joins will get

https://forms.gle/gUJr3QFtiuMpp65B6

Bonus 1:- Free 7 Days Skin Glow Recipe Guide
(घरच्या घरी बनवता येतील असे Detox + Face Glow Drinks PDF)

Bonus 2:- Bedtime Relax Yoga + Skin Care Night Routine Video
(तुमचं शरीर + मन शांत होईल आणि चेहऱ्यावर झोपेतच ग्लो येईल ✨)

Photos from Nari Shakti Yoga Kendra's post 26/06/2025
07/10/2024

🌈 World's Top 10 Recognized Healthiest Foods | Have You Tried Them?
🌲 As the saying goes, "disease enters through the mouth," indicating the close relationship between what we eat and our health. If you want to have a healthy body, you should eat more healthy foods. So, what are the world's recognized healthiest foods? Today, I have compiled a list of the top 10 recognized healthy foods in the world. Make sure to learn about them and start incorporating them into your diet.

✅ Apples

✅ Tomatoes

✅ Spinach

✅ Oats

✅ Salmon

✅ Garlic

✅ Blueberries

✅ Sweet potatoes

✅ Green tea

✅ Red wine

05/08/2024

Weekend Wow Offer Join Online And Offline Batches Saturday And Sunday @ Rs. 999 (51% off)
5-Aug 8:00 AM to 31-Aug 10:00 AM

Link: https://www.facebook.com/profile.php?id=100050215754614&mibextid=ZbWKwL

Special Weekend 2 hour's Batch for IAT and job holders .
Reduced Strees Anxiety Depression. Weight loss/gain, PCOS /PCOS, Harmonal Imbalence. Commen Batch for men and womes
Online and Offline Batches Available

Terms & Conditions
○ Join before 5min,
○ Attend classes regular.
○ Before class and after class 30 min drinking water
○ Pay in advance

14/07/2024

*डोकेदुखीवर मात करायचीय?*

*प्रत्येक डोकेदुखीकरिता वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज पडतेच असे नाही. काही प्रकारची डोकेदुखी जेवण न घेतल्याने, स्नायूंचा ताण यांच्यामुळेही होते आणि तिच्यावरचा औषधोपचार घरीच केला जाऊ शकतो. परंतु, काही प्रकारची डोकेदुखी गंभीर बाबींशी संबंधित असू शकते आणि त्यामध्ये वैद्यकीय मदतीची गरज भासते.*

*डोकेदुखीत शुद्ध हरपत असेल, गोंधळायला होत असेल, द‍ृष्टीत फरक पडत असेल, शारीरिक अशक्‍तपणा येत असेल किंवा तापाबरोबर डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरी सल्ल्याची गरज आहे, हे समजून घ्यायला हवे.*

*ताण (टेन्शन), मायग्रेन (अर्धशिशी) आणि क्लस्टर हे डोकेदुखीचे प्रकार आहेत. मायग्रेन व क्लस्टर हे व्हॅस्क्युलर डोकेदुखीचे प्रकार आहेत. यात शारीरिक श्रम जास्त त्रासाचे ठरतात. डोक्याच्या पेशींमधील रक्‍तवाहिन्या यात सुजतात किंवा पसरतात. त्यामुळे ठणका लागून डोके दुखते.*

*मायग्रेन डोकेदुखीचा प्रकार प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो; पण सामान्यात: ह्याच्या लक्षणांमध्ये डोक्याच्या दोन्ही किंवा एका बाजूला खूपच दुखणे आणि मळमळ किंवा उलटी होणे, प्रकाश सहन न होणे, द‍ृष्टीत गोंधळ, चक्‍कर येणे, ताप व थंडी वाजणे अशी लक्षणे आढळतात.*

*मायग्रेन डोकेदुखीला अनेकविध गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. काही लोकांना विशिष्ट प्रकारच्या आहाराचे वावडे असते. त्यामुळे त्यांच्या डोक्यास ठणका लागतो. काहींना वाईन, चॉकलेट, जुने चीज, प्रक्रिया केलेले मांस तसेच कॉफीन व अल्कोहोलमुळेदेखील मायग्रेन उद्भवते.*

*क्लस्टर डोकेदुखी ही मायग्रेनपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. ती सामान्यत: पुन्हा पुन्हा होत राहते. कधी आठवडाभर तर कधी काही महिनेदेखील टिकू शकते. सामान्यत: पुरुषांमध्ये ही क्लस्टर डोकेदुखी मोठ्या प्रमाणात आढळते आणि ती अत्यंत वेदनादायी असते.*

*मानसिक ताणामुळे किंवा स्नायूंच्या आकुंचनामुळे होणारी डोकेदुखी हीदेखील सर्वत्र आढळणारी त्यामुळे सामान्य प्रकारची मानली जाणारी डोकेदुखी असते आणि ताण जितका वाढता तितकी तीदेखील वाढत जाते.*

*मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी बहुतेक स्थिर व कमी त्रासदायक असते. ही दुखी कपाळ, कानशिले आणि मानेच्या मागील बाजूला जाणवते. असे आढळून आले आहे की, सर्व प्रकारच्या डोकेदुखींमागचे कारण 90 टक्के वेळा मानसिक ताण हेच असू असते.*

*सायनस डोकेदुखी हासुद्धा एक वेगळा प्रकार आहे. सायनस डोकेदुखी ही सायनस संसर्ग किंवा अ‍ॅलर्जीमुळे होते. सायनस डोकेदुखीत डोळे, गाल आणि कपाळावर दबाव पडतो आणि खूप दुखते, वरच्या दातांमध्ये दुखल्यासारखे वाटते, ताप व थंडी वाजून येणे, चेहर्‍यावर सूज येणे इत्यादी लक्षणे जाणवतात.*

*सर्दी किंवा फ्लूनंतर होणारी सायनस डोकेदुखी नाकाच्या वर आणि मागे असलेल्या हाडांच्या पोकळीतल्या सायनस मार्गात सूज आल्याने होते. सायनस तुंबल्यास किंवा त्यांना संसर्ग झाल्यास तो ताण डोक्यावर पडतो आणि डोकेदुखी होते. हे दुखणे फार गंभीर व निरंतर असते, सकाळी सुरू होते आणि वाकल्यावर आणखीच जास्त जाणवते.*

*मायग्रेन, सायनस, मानसिक ताणातून उद्भवणारी डोकेदुखी आपल्याला नेमक्या कुठल्या प्रकारची डोकेदुखी सतावते आहे, हे निरीक्षणाद्वारे समजून घ्यायला हवे. आपली निरीक्षणे डॉक्टरांना सांगायला हवीत, म्हणजे यथायोग्य उपचार मिळवणे शक्य होईल.*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*

*नारी शक्ति योग केंद्र* 
 *आयोजित 
पुणे जिल्हयातर्फे 21जून आंतरराष्ट्रीय योगदिवसा निमित्त  खास  महिलांसाठी  ऑनलाईन/ऑफलाईन वर्ग!
* 

 *महिलांचे स्वास्थ्य: योग आणि निसर्गोपचार, आयुर्वेदानुसार*..* 

*प्रिय मैत्रिणींनो*,
 *आपल्याला शारीरिक व मानसिक बदलांचा सामना करावा लागतो. या वयात आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी योग आणि आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात घेऊन एक खास कार्यशाळा आयोजित केली आहे*.

*🗓️ तारीख: 22 जून**, *शनिवारी* 
*🕘 वेळ: 7am-8.30am* 
*🏠 स्थळ:नारी शक्ति योग केंद्र,जिजामाता चौक,भारती विद्यापीठ मागे ,धनकवडी पुणे 
आणि 
 तुमच्या घरून Google meet online*
https://meet.google.com/pkn-yycz-zej

 *आपल्यासाठी कार्यशाळेचे फायदे*:
*आरोग्य सुधारणा: नियमित योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य सुधारता येईल*.
*मानसिक शांतता: ध्यान आणि प्राणायामाच्या साहाय्याने मन शांत ठेवता येईल*
*.ताण-तणाव कमी होणे: नियमित योगासने आणि प्राणायाम ताण-तणाव कमी करण्यास मदत करतील.संपूर्ण आरोग्य: आयुर्वेद,निसर्गोपचार आणि योगाच्या सहाय्याने संपूर्ण आरोग्य सुधारता येईल*
* 
*.तुम्हा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण! चला, एकत्र येऊन आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करूया.स्वास्थ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा!* 21/06/2024

*नारी शक्ति योग केंद्र* *आयोजित पुणे जिल्हयातर्फे 21जून आंतरराष्ट्रीय योगदिवसा निमित्त खास महिलांसाठी ऑनलाईन/ऑफलाईन वर्ग! * *महिलांचे स्वास्थ्य: योग आणि निसर्गोपचार, आयुर्वेदानुसार*..* *प्रिय मैत्रिणींनो*, *आपल्याला शारीरिक व मानसिक बदलांचा सामना करावा लागतो. या वयात आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी योग आणि आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात घेऊन एक खास कार्यशाळा आयोजित केली आहे*. *🗓️ तारीख: 22 जून**, *शनिवारी* *🕘 वेळ: 7am-8.30am* *🏠 स्थळ:नारी शक्ति योग केंद्र,जिजामाता चौक,भारती विद्यापीठ मागे ,धनकवडी पुणे आणि तुमच्या घरून Google meet online* https://meet.google.com/pkn-yycz-zej *आपल्यासाठी कार्यशाळेचे फायदे*: *आरोग्य सुधारणा: नियमित योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य सुधारता येईल*. *मानसिक शांतता: ध्यान आणि प्राणायामाच्या साहाय्याने मन शांत ठेवता येईल* *.ताण-तणाव कमी होणे: नियमित योगासने आणि प्राणायाम ताण-तणाव कमी करण्यास मदत करतील.संपूर्ण आरोग्य: आयुर्वेद,निसर्गोपचार आणि योगाच्या सहाय्याने संपूर्ण आरोग्य सुधारता येईल* * *.तुम्हा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण! चला, एकत्र येऊन आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करूया.स्वास्थ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा!*

आरोग्यनिती 200🥗🧘🏽‍♂️🙂 14/06/2024

*जीवनसत्त्वे व क्षार*

शरीराला हया घटकांची आवश्यकता कमी प्रमाणात असते . परंतु त्यांचे महत्त्व फार आहे . शरीराला ती विविध प्रकारे उपयोगी पडतात . जीवनसत्त्वांचा उपयोग कर्बोदक पदार्थ , प्रोटीन व चरबी यांचे योग्य प्रकारे पचन झाल्यावर , त्यांचे अभिशोषण होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतो . हया क्रियेसाठी ती अनिवार्य आहेत . विविध क्षार हे ( minerals ) पेशींच्या निर्मितीकरता आवश्यक आहेत . निरोगी शरीरासाठी त्यांची आवश्यकता आहेच , पण , आजारपणात त्यांची विशेष आवश्यकता असते . जीवनसत्त्वे व क्षारांची कमतरता पुष्कळ प्रकारे त्रासदायक होते . आजारात जीवनसत्त्वांचा संचय झपाट्याने कमी होऊ लागतो . अयोग्य आहार , मानसिक संताप , प्रदूषण तसेच धूम्रपान , मद्यपान , चरसगांजा हयांचे सेवन ही जीवन सत्त्वांचा नाश करणारी इतर कारणे आहेत . धूम्रपान करणाऱ्यांच्या शरीरातील २५ मि . ग्रॅम इतके ' सी ' जीवनसत्त्व एक सिगारेट ओढल्याने नष्ट होते . इतर जीवनसत्त्वांचाही असाच नाश होतो . इतर व्यसनांमुळे देखील जीवनसत्त्वांचा नाश होतो . हल्लीच्या काळातील मानसिक ताणांमुळे व गतीमय जीवनामुळे माणसाची जीवनसत्त्वांची आवश्यकता वाढली आहे . एका बाजूला ही आवश्यकता अनेक पटीने वाढली आहे व अयोग्य आहार आणि लहानसहान दुखण्यांसाठी सल्फा , अॅन्टिबायोटिक , कॉर्टिझॉनसारख्या औषधांच्या उपयोगाने शरीरातील जीवनसत्त्वांचा साठा कमी कमी होत आहे . वरील हकिकतीवरून हे स्पष्ट होते की , पूर्वी कधीही नव्हती इतकी जीवनसत्त्वांची जरूरी आज आपल्याला आहे . ही सत्त्वे मिळण्याचा सोपा उपाय म्हणचे कच्चा आहार , मोड आलेली धान्ये व कडधान्ये , फळे , भाजीपाला व त्यांचे रस ह्यांचा उपयोग आहारात करणे . अन्न शिजवताना जीवनसत्त्वे नाश पावतात . तसेच फळे व भाज्या कापून काही वेळ ठेवल्यानेही जीवनसत्त्वे नाश पावतात . काही आहारतज्ञ असा दावा करतात की जीवनसत्त्व B12 फक्त मांसात मिळू शकते .
मांस कच्चे खात नाहीत व शिजवताना त्यातील जीवनसत्त्व B12 चा मोठ्या प्रमाणात नाश होते ही गोष्ट ते विसरतात ! नैसर्गिक खादयपदार्थातील जीवनसत्त्वे जिवंत व सुपाच्य स्वरूपात असतात . त्यामुळे ती शरीरात लगेच व संपूर्णपणे विरघळतात . कृत्रिम जीवनसत्त्वे म्हणजे गोळ्या घेऊन मात्र तेवढा फायदा होत नाही असे अनेक प्रयोगांद्वारे निर्णायकरीत्या सिद्ध झाले आहे . आहारातील नैसर्गिक जिवंत क्षार कोलॉइडल ( Colloidal form ) स्वरूपात असतात व शरीरात लगेच आत्मसात होतात . कृत्रिम क्षारांचा शरीर विशेषसा उपयोग करू शकत नाही . थोडक्यात म्हणजे जर शरीरात क्षारांची कमतरता असेल तर ती औषधांनी भरून निघत नाही.

आरोग्यनिती 200🥗🧘🏽‍♂️🙂 WhatsApp Group Invite

01/06/2024

*वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल*

* संध्याकाळी लवकर सूर्यास्ताच्या आत किंवा निदान 7 ते 7.30 पर्यंत जेवावे.
(त्यासाठी सकाळी 8 च्या आत हलका नाश्ता -पेज,मउभात,सूप इत्यादी किंवा नाष्टा न करणे व दुपारचे जेवणच 10.30 ते11 पर्यंत घेणे आवश्यक)

* संध्याकाळी जेवणानंतर कोणतेही द्रवपदार्थ पाणी,कॉफी,चहा,कॉल्डड्रिंकjuice,ice cream इत्यादी न घेणे .
लवकर जेवल्यामुळे भूक लागल्यास लाह्या,कुरमुरे,खाकरा,
राजगिरा लाडु असे कोरडे पदार्थ खावे.

*तहान नसताना,जेवणानंतर लगेच, सूर्यास्तानंतर ,उगाच अनावश्यक पाणी पिऊ नये

*पाणी नेहमी बसून,भांड्याला तोंड लावून,चहाप्रमाणे घोट घोट प्यावे .उभ्याने बाटलीने गटागटा पाणी पिऊ नये.

*उन्हाळ्यात साधे/माठाचे व हिवाळ्यात कोमट किंवा गरम पाणी तहानेनुसार प्यावे.ऋतूनुसार पाण्यात औषधी पदार्थ टाकावे .
उदा -उन्हाळ्यात धणे ,जिरे घालून उकळलेले पाणी किंवा पावसाळ्यात सुंठ,नागरमोथा घालून उकळून गाळून घेतलेले पाणी

*पोट चेपले जाईल असे व्यायाम करावे. सूर्यनमस्कार,साष्टांग नमस्कार, लोटांगण, प्रदक्षिणा ,योगासने(बसून,
उभे राहून,पोटावर झोपुन व पाठीवर झोपून ) इत्यादी सर्व प्रकारची योगासने करावी.

*चालणे,धावणे,नृत्य,पोहोणे,टेनिस,बॅडमिंटन इत्यादी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करावे.

कार,लिफ्ट,सोफा,कमोड यांचा वापर कमीत कमी करावा .
खाली बसणे, जिने चढणे,पायी चालणे,हाताने जास्त कामे करणे उदा- कपडे धुणे,पिळणे,लादी पुसणे,बागकाम,कणिक मळणे,नारळ खरवडणे इत्यादी करावे.

*सतत एका जागी बसणे टाळावे, मध्ये उठून थोडे फिरावे , stretching करावे.

*आहारात गहू,बेकरी पदार्थ पाव,बिस्कीट,केक,मैदा कमीत कमी वापरावा.
ज्वारी,बाजरी,नाचणी भाकरी किंवा फुलके खावे.

*तांदूळ 1वर्ष जुना,कमी पॉलिशचा,स्थानिक जातीचा वापरावा.
भात उघड्या पातेल्यात बनवलेला,पेज काढून टाकलेला खावा.अशा भाताने वजन,चरबी,शुगर वाढत नाही.
नवीन तांदूळ,कुकरचा भात,बासमती सारखे पचायला जड तांदूळ वापरले तर मात्र वजन वाढू शकते.

* जर्सी गायीचे दूध,चीज,बटर,दही,योगर्ट,
चॉकलेट इत्यादी बंद करावे.

देशी गाईचे (A2मिल्क) (सकाळी ) ,
देशी गाईचे तूप (जेवताना गरम भात किंवा भाकरीला लावून) ,
ताक (दुपारी जेवताना) घ्यावे.

* ताज्या भाज्या विशेषतः फळभाज्या (पालेभाज्या कमी) व season नुसार फळे नाश्त्यामध्ये व जेवणात खावी .फळांचे juice व अन्य पदार्थ नको.

*मधल्या खाण्यासाठी सर्व प्रकारच्या लाह्या,उकडलेले मूग,
काळ्या मनुका (black resins),
जर्दाळू (apricot),खारीक,
लाह्यांचा किंवा कुरमुऱ्याचा चिवडा, खाकरा,चिकी,ताजे घरी बनवलेले भाज्यांचे सूप घ्यावे

*पुदिना,आले,लसूण, कांदा, मिरे,जिरे,दालचिनी,हळद या मसाल्यांचा भरपूर वापर करावा

* ब्रॉयलर प्रकारचे , फ्राईड,फ्रोझन नॉनव्हेज टाळावे.
नॉनव्हेज कमीच खावे शक्य असल्यास पूर्ण टाळावे .

*जेवणानंतर 10 मिनिटे सावकाश फेऱ्या माराव्या.

*आंघोळ करताना साबण वापरू नये. त्रिफळा चूर्ण,शिकेकाई चूर्ण, मसुर डाळीचे पीठ असे पदार्थ साबणा ऐवजी वापरावे.चरबी जास्त असणाऱ्या ठिकाणी थोडे घासून लावावे.

28/05/2024

New Batch start from 3 june 24
Book your free trial now
More information 70832 35618

21/05/2024

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid02NWYC5RMt5X6w2oFcL9VCVfg6t4dPevERzFUgM1Mc4qrS5dbv6cugvzp6MeYGbUxXl&id=100082585878466

"Are you struggling with PCOD/PCOS and looking for a natural way to manage your symptoms? Join our specialized yoga classes designed to help women with PCOD/PCOS.
"Discover the power of yoga in managing PCOD/PCOS symptoms. Our tailored yoga classes are designed to support women dealing with PCOD/PCOS. Our experienced instructors will lead you through gentle yet impactful yoga techniques to balance hormones, enhance metabolism, and alleviate stress. Take the proactive approach to a healthier and happier life.
Get in touch with us to reserve your spot today!"🥰

Language in Marathi

join our What's Up group for more information
https://chat.whatsapp.com/Et43xai6Yjy18E8Gg5Jy4k

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Sr. No. 28 , Ambegaon Pathar , Matoshree Bulidling , JIjamata Chowk , Behind Bharti Vidhaypeeth
Pune
411046

Opening Hours

Monday 6am - 10:30am
4:30pm - 7:30pm
Tuesday 6am - 10:30am
4:30pm - 7:30pm
Wednesday 6am - 10:30am
4:30pm - 7:30pm
Thursday 6am - 10:30am
4:30pm - 7:30pm
Friday 6am - 10:30am
4:30pm - 7:30pm